
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील सावनेर येथे पाणी पुरवठा विभागातर्फे पान्याची टाकी उभारण्यात आली व्यवस्थीत पाणी पुरवठा चालू होता पण गावांमध्ये नालीचे खोदकाम सुरू असताना पाइपलाइन तुटली आहे हि पाइपलाइन रोडच्या दोन्ही बाजूंनी आहे यातील एका बाजूची पाइपलाइन हि सुरळीत आहे पण गेल्या दोन दिवसांपासून या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी भरले जात नाही आहे नागरिकांची गैरसोय होत आहे फुटलेल्या पाइपलाइन चे काम चालू आहे पण टाकी असून त्यात पाणी भरले जात नाही आहे संध्या सावनेर ग्रामपंचायत वर प्रशासकीय अधिकारी आहेत सचिव मात्र येताना दिसत नाही नागरिकांनी कोनाकडे समस्या मांडायच्या हा प्रश्न उपस्थित केला जात आहे ग्रामपंचायत ला कर्मचारी आहेत पण कामामध्ये हलगर्जीपणा करतात सदर या बाबीचा विचार करून गावकऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा करावा अशी मागणी सावनेर येथील नागरिकांनी केली आहे.
