कोरोनाच्या काळात उत्कृष्टपणे आरोग्य सेवा दिल्याबद्दल धानोरा सर्कल मधून डॉक्टर श्यामसुंदरजी गलाट यांचा कोरोना योद्धा म्हणून वसंत जिनींग मध्ये सत्कार सोहळा संपन्न

राळेगांव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील डॉक्टर श्यामसुंदरजी गलाट साहेब हे चाळीस वर्षापासून रुग्णसेवा करत आहे. यांनी जिवाची पर्वा न करता अभूतपूर्व कोरोना काळात जनतेला रुग्णसेवा दिल्याबद्दल त्यांचा 17/08/2021ला आमदार प्रा.डॉ.अशोकरावजी उईके यांच्या हस्ते सत्कार सोहळा करण्यात आला. त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजनदादा कोल्हे, पंचायत समिती सभापती प्रशांतभाऊ तायडे, भाजपा शहराध्यक्ष कुणालभाऊ भोयर, माजी सभापती सदाशिवराव महाजन, विवेक भाऊ दौलतकर, धानोरा गावाचे उपसरपंच विशालभाऊ येनोरकर व अनेक भाजपा पदाधिकारी हजर होते.