
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गिरीधर ससनकर गुरुजी यांना 2022चा राष्ट्रसंत माणिक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार घरोघरी पोहचला पाहिजे यासाठी मधुसुदन कोवे सर यांनी “तुकड्याची झोपडी ” ही एक वैचारिक पुस्तिका तयार करुन प्रकाशित करण्यात आली. यामध्ये राळेगाव येथील गिरीधर ससनकर सर यांनी महाराजांच्या आठवणी आपल्या लेखनीतुन माडल्या होत्या आणि त्यांची निवड एक सामाजिक सेवक म्हणुन करण्यात आली होती.
नुकतेच वर्धा येथील अहिल्याबाई होळकर सभागृहात मा.अँड वामनराव चटप माजी आमदार तथा शेतकरी संघटनेचे नेते यांच्या हस्ते व डाँ.सौ.मालीनीताई वडतकर संचालिका तथा विभाग प्रमुख प्रियदर्शनी महिला महाविद्यालय वर्धा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मधुसुदन कोवे अध्यक्ष ,ग्राम स्वराज्य महासंघ यवतमाळ यांच्या उपस्थितीत गिरीधर ससनकर गुरुजी यांना शाल,श्रीफळ व मानपत्र देउन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मधुकर गेडाम सेवानिव्रृत तहसिलदार ,प्रा.मोहन वडतकर,आशाताई काळे,सौ.रेखा निमजे,नागोराव काकपुरे,अशोकराव उम्रतकर,कृष्णराव माकोडे,श्रीमती शैला मिर्झापुरे,शंकरराव तोडासे,वाल्मिकराव मेश्राम,भगवान धनरे,अंकुशराव राजकोल्हे,प्रभाकर चवरे,पांडुरंग ससनकर,अशोक पापडकर प्रामुख्याने उपस्थित होते.
गिरीधर ससनकर यांना पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक व अभिनदंन होत आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुसुदन कोवे यांनी तर सुत्रसंचालन राजेश कापसे तर आभार सौ.माया कोवे यांनी व्यक्त केले.
