मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

           

ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव द्वारा संचालित मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज बरडगाव येथे विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.स्मार्ट डस्टबिन इलेक्ट्रिक स्कुलबेल स्मार्टस्कुल शेतकऱ्यांना उपयोगी असे साईल वॉटर कंट्रोलर, दैनंदिन उपयोगाचे आरएफआयडी डोअरलॉक व वाटर लेव्हल अँड टॅंक ओवरफ्लो कंट्रोलर इत्यादी प्रयोग प्रदर्शनात ठेवण्यात आले.या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून अनेक आविष्कारात्मक प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमधे वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांचा विकास व्हावा हा प्रमुख उद्देश ठेवून नवनवीन आविष्कार विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केले. विशेष म्हणजे शाळेला उपलब्ध असलेली अटल टीकरिंग लॅब च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधनास चालना मिळत आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. संतोष कोकुलवार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच संस्थेच्या संचालिका डॉ. शीतल बलेवार यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले. सदर प्रदर्शन शाळेचे विज्ञान शिक्षक श्री. सुमिलेश गजभीये यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. शाळेचे प्राचार्य श्री. सतीश काकडे तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी प्रदर्शनीचे यशस्वीतेसाठी सहकार्य केले