खैरी येथील युवा शेतकऱ्याची आत्महत्या.

राळेगांव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

       

तालुक्यातील खैरी येथील एका ४० वर्षीय युवा शेतकऱ्याने गावालगतच्या नाल्यात उडी घेऊन जिवन यात्रा संपविली.हि दुर्दैवी घटना आज २७ जुन रोजी सकाळी उजेडात आहे.
विजय पुंडलिकराव वरटकर (४०) रा.खैरी असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव असून गेल्या काही वर्षांपासून त्याला कर्जाच्या चिंतेने सतावत होते.त्यातच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.त्याच्या नावाने खैरी शिवारात पाच एकर कोरडवाहू शेत जमीन असुन सलग दोन वर्षांपासूनच्या नापिकीने तो कायम विवंचनेत होता.अशातच काल २६ जुन रोजी सायंकाळी घरुन बाहेर गेला व गावालगतच्या वरोरा मार्गावरील नाल्यात उडी घेतली.दरम्यान मृत्युच्या पुर्वी त्यांने पत्नीला फोन करून मोबाईल खिशातील पैसे व इतर साहित्य नाल्यालगत ठेवून आहे असे त्याने सांगितल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून न आल्याने या घटनेची माहिती वडकी पोलीसांना दिली.दरम्यान पोलिसांनी आज २७ जुन रोजी सकाळी गावकऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेतला असता नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला.पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.त्याचे पश्चात पत्नी दोन मुली आई वडील व दोन भाऊ असा परिवार आहेत.