
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
ऐसे करावे दर्पण ! जन लोका होईल ते अर्पण
स्मरणिका स्पंदन एक आठवण ! आम्हां होईल हृदयात…..
तुकड्या ची झोपडी या स्मरणिकेचे प्रकाशन आणि राष्ट्रसंत माणिक रत्न पुरस्कार सोहळा कार्यक्रम दिनांक ९जानेवारी २०२२ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक हॉल मध्ये संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ मालिनी वडतकर-वर्धा प्रमुख अतिथी ॲड.मा.वामनराव चटप ( माजी आमदार शेतकरी नेते ) मा.मधुसुदन कोवे अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा आशा ताई काळे -यवतमाळ रेखा निमजे- नागपूर प्रा.मोहण वडतकर आणि प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.मधुसुदन कोवे गुरुजी केले असता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आज देशात गरज आहे देशात इंग्रजांच्या गुलामगिरी पेक्षा अस्मानी संकट वाडती लोक संख्या झुठी जुल्मिशाहीने भारतीय माणूस भयभीत झाला आहे. म्हणून राष्ट्रसंतांच्या वैचारिक क्रांती ची आज देशाला गरज आहे.असे मत प्रास्ताविक विचारांतून व्यक्त केले आहे
राष्ट्रसंत माणिक रत्न पुरस्कार प्राप्त विचारवंताचा सन्मान प्रतिष्ठीत मान्यवर यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले आहे प्रामुख्याने मा.गिरीधरजी ससनकर – राळेगाव गुलाबराव धांडे – श्रीमती शैला मिर्झापुरे-यवतमाळ सौ प्रिती दिडमुठे-चंद्रपुर मा.नागोराव काकपुरे-यवतमाळ सौ.मंजु प्रकाश हेडाऊ-नागपुर श्री संदीप येळणे- वर्धा श्री राजेन्द्र भोयर – वर्धा डॉ बावनकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
तुकड्या ची झोपडी पुस्तक प्रकाशन सोहळ्याला गुरुदेव सेवा मंडळ साठगाव जिल्हा चंद्रपूर गुरुदेव सेवा मंडळ बोराटी सराठी गुरुदेव सेवा मंडळ वर्धा यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारवाणीतुन भजनाचे सादरीकरण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा राजेश कापसे वर्धा यांनी केले.
राष्ट्रसंत माणिक रत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती च्या संदर्भात सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणात प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की हा कारवा वैचारिक क्रांती चा आहे आणि तो तुम्ही तुकड्या ची झोपडी च्या संकल्पनेतून देशाला दाखवत आहे हे ग्राम स्वराज्य महामंच चे राष्ट्रव्यापी कार्य आहे हे असंच सुरू ठेवा आम्ही सोबत आहे असे मतं व्यक्त केले आहे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ माया कोवे-यवतमाळ यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदना म्हणून करण्यात आली आहे.
