
राळेगांव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
विशेष बातमी…
शहरातील प्रतिष्ठित महिला वयोवृद्धाने,अर्धांगवायू असून त्यातच कोरोणा पाॅझीटिव आल्या पण मात्र प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर घरच्या घरी औषधोपचार घेऊन ठणठणीत बऱ्या तर झाल्याच सोबत च अपंगत्व ही दूर झालं आहे.
राळेगांव ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच विनोद पावडे यांच्या मातोश्री श्रीमती विमलताई यादवराव पावडे यांना अर्धांगवायू आणि त्यातच कोरोणा पाॅझीटिव आल्या. दवाखान्यात काही ही झाले तरी भरती व्हायचे नाही हा निश्चय करुन डाँक्टरांच्या सल्लाने योग्य तो औषधोपचार घरच्या घरी च घेऊन अवघ्या आठ दिवसात त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलां आहे. विशेष म्हणजे अर्धांगवायू मुळे जे अपंगत्व आले होते ते सुध्दा बरे झाले आहे.प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर वय वर्ष पंच्यांशी असताना कोरोणा सारख्या आजारावर सुध्दा मात करता येते हे विमलताई नी दाखवून,नवतरुणां समोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे….
