
संत जगन्नाथ बाबा देवस्थान चे संस्थापक वासुदेव धानोरकर यांचा भव्य सत्कार !
मिरवणुकीतील दिंडीत बजरंग बली आकर्षण केंद्र होते.
बालकांच्या भजन मंडळाने दिला ग्रामस्वच्छतेचा -एकोप्याचा संदेश !
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती ऐतिहासिक तालुक्यातील चिरादेवी या गावात श्री विदैही सद्गुरु संत जगन्नाथ बाबा यांचे देवस्थान १६ मार्च २००६ ला स्थापित करण्यात आले असून गेली कित्येक वर्षापासून १६ तारखेला (घुगरी काला) प्रसाद दर महिन्याला भजनाच्या गजरात स्वयंस्फूर्तीने तयार करण्यात येतो .दरवर्षी १६ मार्च ला संत जगन्नाथ बाबा देवस्थान स्थापनादिन दिन मोठ्या प्रमाणात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात केल्या जातो. गेली दोन वर्षभरात कोरोणा चे सावट होते .त्यामुळे अगदी साध्या सोप्या पद्धतीने गावातच १६ मार्च ला स्थापना दिन साजरा केला गेला . चिरा देवी या गावात दर महिन्याच्या १६ तारखेला कुठल्याच प्रकारची शेतातील शेतीची कामे केली जात नाही हे या गावचे विशेषस्वयम् पूर्ण धोरणात्मक नियमावली आहे .या देवस्थानाची स्थापना सामाजिक बांधिलकी, भक्तीभावाचा वसा घेऊन चालणारे मंदिराचे संस्थापक सेवानिवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापक वासुदेव बापूजी धानोरकर यांनी केली असून, आत्तापर्यंत उत्तम पणे सेवाभावी वृत्तीने जबाबदारी सांभाळली. याबद्दल गावातील लोकसहभाग विचारधारेतून देवस्थान परिसरातील मंदिर सभागृह मध्ये आयोजित स्थापना दिवसा प्रसंगीच हजारो भावी भक्त लोकांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते ,कला अकादमीचे संचालक, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र तिराणिक यांच्या हस्ते आदरणीय वासुदेव धानोरकर यांचा शाल व श्रीफळ सन्मानपत्र व बॅग देऊन समाज गौरव सन्मान करण्यात आला. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष विनोद उपरे, उपाध्यक्ष रवींद्र कोंगरे कार्यकारणी पदाधिकारी शंकर ताजणे, रमेश ताजणे ,अशोक वासेकर, सरपंच निरुपा ला मेश्राम ,उपसरपंच प्रदीप देवतळे तुळशीराम बदखल गजानन सातपुते, सुनील काळे आदींची उपस्थिती होती . संत जगन्नाथ बाबा देवस्थान स्थापना दिनी १६ मार्च २०२२ ला कार्यक्रम प्रसंगी
१९ भजनांची भव्य दिव्य दिंडी पालखी ला सोबत घेऊन तब्बल तीन तास संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालत हजारोंचा समुदाय घेऊन दिंडी देवस्थाना पर्यंत पोचली. दिंडी शोभा यात्रेमध्ये विविध वेशभूषा परिधान करण्यात आल्या होत्या. दिंडी मधील बजरंग बली विशेष आकर्षण केंद्र होते. बाल भजन मंडळ यांनी ‘ग्रामस्वच्छता म्हणजेच गावाचा विकास” राष्ट्रीय एकात्मता संदेश भजनाच्या माध्यमातून दिला.
विविध स्तरावरून आलेल्या वैष्णवी भजन मंडळ , ओंकार भजन मंडळ, जगन्नाथ बाबा भजन मंडळ, जगन्नाथ बाबा भजन मंडळ, नवदुर्गा भजन मंडळ, एकता भजन मंडळ, प्रभू श्री राम भजन मंडळ, जय बजरंगबली भजन मंडळ, पवनसुत भजन मंडळ, सावित्रीबाई फुले भजन मंडळ, जय हनुमान भजन मंडळ ,गुरुदेव सेवा मंडळ ,भद्रेश्वर भजन मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ, नवदुर्गा महिला मंडळ, रुद्राक्ष भजन मंडळ, जय जगन्नाथ पदावली भजन मंडळ, जय जगन्नाथ भजन मंडळ ,जय गुरुदेव बाल भजन मंडळ आदी 19 भजन मंडळांची मांदियाळी असलेली दिंडी मिरवणूक गावातून प्रदक्षिणा घालीत निघाली .प्रसंगी प्रत्येक घराघरात आनंद उत्सव ,अंगणात सुंदर अशा रांगोळी व जगन्नाथ बाबांचे फोटो फुलांनी व माळांनी सजवलेले, प्रत्येक ठिकाणी पालखीचे भव्य दिव्य स्वागत फुलांचा वर्षाव करण्यात आले. विविध गावांचा महाप्रसाद घेण्याकरता सहभाग मोठ्या प्रमाणात लाभला. दिंडीत गजानन सातपुते ,अजय मुसळे ,राजू चौधरी ,राजेंद्र वागदर कर, नरेश काळे, बंडू आत्राम, आशिष ठेंगणे अनेकांनी सहभाग दर्शवित व्यवस्थापनात सहकार्य केले. गावातील महिलांनी स्वयम् स्फूर्तीने माधुरी वासेकर, नीता डाखरे कल्पना ताजणे ,पार्वती कोंंगरे , मंजुषा सातपुते , पुष्पाताई धानोरकर आधी बहुसंख्य महिलांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली . प्रसंगी संत जय जगन्नाथ देवस्थान मंदिराला सामाजिक कार्यकर्ते डॉ.रमेश राजूरकर, नितिन मते, श्री वानखेडे आदी इतर अनेक मान्यवरांनी स्वयंस्फूर्तीने हजेरी लावत दर्शन घेतले.
