ब्रँड अम्बिसिडर(स्वच्छता दूत) म्हणून युसुफअली साहेबअली सैय्यद यांची नियुक्ती

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

नगर पंचायत राळेगाव मार्फत स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ व माझी वसुंधरा या अभियाना करीता आपले राळेगाव शहरासाठी ब्रँड अम्बिसिडर(स्वच्छता दूत) म्हणून युसुफअली साहेबअली सैय्यद यांची नियुक्ती करण्यात आली या वेळी कार्यक्रमात मुख्याधिकारी अमोल माळकर, कार्यालय अधिक्षक राहुल मारकड, नगर पंचायत चे अधिकरी व कर्मचारी आणि राळेगाव शहरातील सम्माननीय नागरीक उपस्थित होते तसेच या कार्यक्रमात युसूफअली साहेबअली सैय्यद यांनी राळेगाव शहर स्वच्छ आणि सुंदर कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.