झाडगाव येथे, ग्राम स्वराज्य महामंच च्या वतीने विधवा महिलांसाठी साडीचोळी देवुन केला सन्मान – मधुसुदन कोवे गुरुजी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

महिला सक्षमीकरण करण्यासाठी नवी दिशा नवा उपक्रम हाती घेतं विधवा महिलांना दैनंदिन जीवनात स्वाभिमानाने जगण्यासाठी ” दिवाळी भाऊ बीज ” निमित्ताने एक आठवण माहेरची,”‘ साडी चोळी “‘ कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह झाडगाव येथे करण्यासाठी मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी पुढाकार घेतला होता.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा बाबाराव कीनाके सरपंच उपस्थित होते आणि सामाजिक सेवेत कार्य करणारे मार्गदर्शक मा गोविंद चव्हाण, स्वातंत्र्याच्या शत्रुसंगे,मा कृष्णा भोंगाडे, जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ,प्रा.मंजुषा तिरपुडे पांढरकवडा,मा सुनयना यवतकर ( अजात ) सामाजिक कार्यकर्त्या जिल्हा अध्यक्ष समता परिषद यवतमाळ मा अयुब शेख , अध्यक्ष मानव बेरोजगार समती ( महाराष्ट्र राज्य ) मा वर्षा आडे तालुका अध्यक्ष राळेगाव गोंडवाना गणतंत्र पार्टी मा सचिन राडे ग्राम पंचायत सदस्य झाडगाव हे मान्यवर उपस्थित होते. – या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा युसुफ अली सय्यद राळेगाव यांनी केले आहे आपल्या विधवा महिलांसाठी साडीचोळी देवुन समाजातील लोकांना स्वाभिमान दाखवून देण्यासाठी हा उपक्रम गावा गावात सार्वजनिक स्वरुपाचा झाला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे हा ग्राम स्वराज्य महामंच नी घेतलेला कार्यक्रम स्तुत्य उपक्रम आहे या उपक्रमात संकल्पवादी देहदान करणारे व्यक्तीमत्व मा आशाताई काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विधवांना साडी चोळी देवुन करण्यात आला आहे आणि नवनियुक्त सरपंच श्रीमती सुशीला बाई तुमराम यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला होता. – या कार्यक्रमाचे आयोजन ग्राम स्वराज्य महामंच आणि सर्व संचालक मा गिरीधरजी ससनकर, मोहन वडतकर रेखाताई निमजे यांनी केले या निमित्ताने महादेव सिडाम, हर्षल आडे, रमेश खन्नी, एकनाथ राऊत, मधुकरराव आडे ग्राम पंचायत सदस्य वरुड ( जहांगीर ) दत्ता मरस्कोले, रमेश पेंदाम, नितीन ठाकरे, मारोतराव जुमनाके, शंकर तोडासे वसंतराव सोयाम अरुणा लोनकर अमृता आडे नानाजी आत्राम विष्णू ऊईके करुणा वानखेडे आणि बहुसंख्येने महिला पुरुष, जेष्ठ नागरिक कार्यक्रमांत सहभागी झाले होते