धक्कादायक: दहेगाव येथे अज्ञात व्यक्तीने बैलाना चारले विष

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील शेतकरी दीपक खोके यांची जनावरे गोठ्यात दुपारी दोन वाजता बांधून घरी आले होते त्यानंतर सायंकाळी ४ वाजता बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले असताना अचानक दोन्ही बैल जमिनीवर पडले होते .आणि त्यांच्या तोंडा मधून लाळ गळणे चालू होते या प्रकारचे लक्षणे दिसता त गोठ्य शेजारील व्यक्तींना सांगून जनावरांचे डॉक्टर किशोर खोके ,आणि सचिन दानखेडे,यांना बोलावून बैला वर प्राथमिक उपचार सुरू केले.
सकाळी पुन्हा तीच लक्षणे दिसतात डॉक्टर झोटिंग यांना बोलावून परत उपचार सुरू केले पणं उपचार दरम्यान एक बैल दगावला त्यानंतर पोलिस तक्रार करून pm करण्यासाठी पशू वैद्यकीय अधिकारी वडकी येथील नावरे आले त्यानंतर त्यांनी बैलाचा श्र्वासच्छेविदान करून बैलाच्या पोठात गाहुवाचे पीठ त्यात मिश्रण करून विष( ठीमेट) कालवून बैलांना विष बाधा करण्यात आली असे पशू वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
गोठ्यात बैलांना विष बाधा करणाऱ्या व्यक्तीचे नाव अज्ञात आहे पुढील तपास पोलिस अधिकारी बीट अमलदर विलास जाधव सर करत आहे.