
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
ग्रामीण भागात सलग विद्युत पुरवठ्याची नेहमीच अडचण आहे.गावातिल विद्युत पुरवठा हा एक कींवा दोन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर वर अवलंबुन असतो.ऐखादा ट्रान्सफॉर्मर निकामी झाला, तांत्रिक बिघाड झाला तर संपूर्ण गावाला विद्युत पुरवठा खंडित होत होता. वारंवार होत असलेल्या त्रासाची माहिती विद्युत वितरण कंपनीला देण्यात आली.व कीन्ही जवादे ग्रामपंचायत क्षेत्रात प्रत्येक वार्ड साठी स्वतंत्र विद्युत डीपी ची मागणी सरपंच सुधीर जवादे यांनी केली.सततचा पाठपुराव्यामुळे आज प्रत्येक वार्ड साठी स्वतंत्र विद्युत डीपी मंजूर करण्यात आली.व त्याचे काम प्रगतीपथावर आहे.वाढीव इलेक्ट्रीकल पोल चे ही काम सुरू आहे.यासाठी महावितरण कंपनीचे इंजिनिअर गीरी साहेब, लाईनमन मेश्राम, सरपंच सुधीर जवादे, उपसरपंच रमेश तलांडे, सदस्य प्रसाद निकुरे प्रतिभाताई मोहुर्ले सुषमाताई जवादे,सिमाताई ऊईके,मालाताई लोणबले सचीव सुनील येंगडे साहेब, कर्मचारी पुंडलिकराव लोणबले, मारुती ईठाळे, धनराज तोडसाम व नागरिकांनी सहकार्य केले.
