
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने आझादी गौरव ही पदयात्रा ०९ ऑगस्ट पासून १४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक गाव, तालुकास्तरावरून ७५ किलोमीटर पर्यंत काढण्यात येणार आहे. स्वतंत्र अमृत महोत्सव निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या वतीने गौरव पदयात्रेचे दिनांक ०९ ऑगस्ट रोजी वडकी येथे आयोजन करण्यात आले असून वडकी येथील राळेगाव चौफुली पासून भर पावसात घोषणा देत या पदयात्रेला सुरूवात करण्यात आली.
या पदयात्रेद्वारे काँग्रेसची विचारधारा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवून केंद्रातील भाजपा सरकारकडून होत असलेल्या सुडाचे राजकारणाबद्दल भूमिका जनतेच्या लक्षात आणून दिली आहे. तसेच केंद्र सरकारकडून जीवनावश्यक वस्तुंवर कर लावून महागाईची भेट भाजपकडून दिली जात आहे. महागाई असो की भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेस असो की इतर विरोधी पक्षांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास त्यंच्याविरोधात ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा गैरवापर करून दहशत निर्माण केली जात आहे. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, सर्वसामान्य गरीब लोकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे दरवाढ झाले, भाववाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले आहे. त्या विरोधात काँग्रेस पक्षाने आवाज उठविला मात्र हा आवाज दाबण्यासाठी भाजपा व केंद्र सरकार सूड बुद्धीने शासकीय यंत्रणाचा गैर वापर करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आम्ही अजिबात मागे हटणार नाही.समस्या विरोधात आवाज उठविण्याचा आमचा लोकशाहीचा हक्क आहे. संविधानाने तो हक्क दिला आहे तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. देशाविषयीं, स्वातंत्र्य विषयी जनतेमध्ये देशप्रेम निर्माण व्हावे जनजागृती व्हावे, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात आझादी गौरव झेंडा महोत्सव अंतर्गत पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याची ही सर्व प्रकारची माहिती आझादी गौरव यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचविण्याचे काम करण्यात येत आहे. असे मत येथील उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
यावेळी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकरावजी ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर, माजी शिक्षणमंत्री प्राचार्य वसंतराव पुरके, विलास बापु भोयर, रविंद्र शेराम नगराध्यक्ष राळेगाव, उपाध्यक्ष जानराव गीरी, प्रवीण देशमुख अरविंद वाढोनकर, अरविंद फुटाणे,शशीकांत देशमुख, राजू पोटे, प्रदिप ठुणे, उण्मेश वसंतराव पुरके, अशोकराव पाटील, रितेश भरुट, सौ.प्राची भरुट, किरण कुमरे ,डॉ नरेंद्र इंगोले, सुधीरभाऊ जवादे,शामकांत येनोरकर, अशोक काचोळे ,जीतु कहुरके , वसंतराव शेंटे, राजु ठाकरे, पंकज गावंडे, आशिष पारधी, प्रतीक बोबडे , प्रवीण कोकाटे,अंकुश मुनेश्वर , अंकुश राव रोहणकर , पुरुषोत्तम चिडे ,राहूल होले , अंकित कटारिया, किशोर धामंदे ,तसेच राळेगाव मतदार संघातील अनेक महिला व पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
