
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची पिक कर्ज नियमित परतफेड केली असेल त्यांना प्रोत्साहानात्मक ५० हजारांचे रूपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मार्च महिन्यात झालेल्या बजेट मध्ये या विषयी आर्थीक तरतूद केल्याने शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपया पर्यंतचे अनुदान मिळण्याच्या मार्ग मोकळा झाला असल्याने आघाडी सरकारने आधीच कोरोना माहामारी आणि दररोज वाढत चाललेल्या महागाईमुळे डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा असल्याचे मत राळेगाव ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा राळेगाव नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष जानरावभाऊ गिरी यांनी व्यव्त केले आहे,
यामध्ये सन २०१७ ते १८ सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० या वर्षात शेतकऱ्यांनी पिक कर्ज घेतले हवे. या घेतलेल्या पिक कर्जाचा दिनांक ३० जुन २०२० पर्यत नियमित परतफेड केलेली हवी. शेतकऱ्यांना सन २०१८-१९ मध्ये घेतलेल्या पिक कर्ज रक्कमेवर हि ५० हजार रुपये दिली जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी २०१८-१९ मध्ये पिक कर्ज घेतलेले आहे पण त्याची रक्कम हि ५० हजारांपेक्षा कमी आहे त्यांना कर्जाऐवढया रकमेची मदत केली जाणार आहे तशी माहिती गोळा करण्याचे आदेश नुकतेच सहकारी सोसायट्याना प्रात्प झाले आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या राळेगाव शहरात आगमणावेळी त्यांना राळेगाव शहरांसह तालुक्यातील शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळावा या करीता राळेगाव ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने अध्यक्ष जानरावभाऊ गिरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी, संबंधित अधिकारी आणि सरकारमध्ये पाठपुरावा करून अखेर शेतकऱ्यांना प्रोत्साहातमक अनुदान मिळण्याच्या मार्ग मोकळा झाला यामुळे महाराष्ट्र सरकारचे शेतकरी बांधवांकडून आभार व्यक्त होत आहे.
