वादळी पावसाने उमरविहिर येथे प्रचंड नुकसान

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील
उमरविहिर येथे वादळी वाऱ्यासह पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. सविस्तर वृत्त असे राज्या मध्ये मान्सून दाखल झाला असून जिल्हयामध्ये जोरदार पावसासह वादळाने थैमान घातले आहे.दुपार उमरविहिर येथे वादळ सह जोरदार पाऊस झाला त्या मध्ये नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले अनेक घरावरील टिन पत्रे वाऱ्यासह उडून गेले,तसेच गोठ्यातील जनावरांना मोठ्या प्रमानात इजा झाली आहे,शेती मध्ये पेरणीची वेळ आहे व बैल दुखापतग्रस्त आहे,यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न आहे.सुदैवाने जीवित हानी झाली नाही ,काही वृक्ष मुळा सकट जमिनी बाहेर आले एवढा वाऱ्याचा वेग होता.सामान्य जनतेचे नुकसान पाहता शासनाने त्वरित पंचनामा करून नागरिकांना आर्थिक मदत करावी. अशी मागणी उमरविहीर येथील नागरिकांनी केली आहे.