

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त २५ ऑक्टोबर रोजी मानवता मंदिर श्रीकृष्ण देवस्थान कृष्णापूर येथे मौन श्रध्दांजली कार्यक्रम केशवराव देशमुख यांचे उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष एडवोकेट फिडेलजी बायदाणी, तर प्रमुख अतिथी युसुफअली सैयद, यांची उपस्थिती होती प्रमुख अतिथी यांनी यावेळी आपल्या उदबोधनातून ग्राम स्वयंपूर्ण स्वांलबी सक्षम आत्मनिर्भर करायचे असेल तर गावागावात शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू केले पाहिजे गांव आत्मनिर्भर बनवून राष्ट्रसंताचे अपूर्ण कार्य पूर्ण केले पाहिजे ही आजची गरज असल्याचे प्रतीपादन युसुफ सैयद, यांनी केले अध्यक्ष एडवोकेट फीडेल जी बायदाणी यांनी वरील उदबोधन काळसंगत आहे व राष्ट्रसंताचे जिवन कार्यावर प्रबोधन केले.
