
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
महिला व बाल विकास संदर्भात सर्व योजना जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरुन राबविण्यात येतात. याचा लाभ नगर पंचायत मधील लाभार्थीं ना मिळत नाही. कारण नगर पंचायत या अर्ध शहरी प्रभागात मोडतात. यामुळे महिला व बाल विकास मंत्रालय संदर्भात योजनांचा लाभ नगर पंचायत मधील सबंधितांना मिळावा या साठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करावे. जेणे करुन अर्ध शहरी असलेल्या नगर पंचायती या बहुतांश तालुका ठीकाणी च आहे .आपल्या खात्याच्या मंत्रालयाच्या सर्व योजनांचा लाभ नगर पंचायत मधील मिळायला हव्यात अशा आशयाचे निवेदन महिला व बाल विकास मंत्री ना.यशोमती ठाकूर यांना नगर पंचायत राळेगांव च्या पदाधिकाऱ्यांनी देऊन महत्त्वाच्या विषयाला हात घातल्या ने समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी नगराध्यक्ष रविंद्र शेराम व उपनगराध्यक्ष जानराव गीरी,महिला व बाल कल्याण सभापती सौ मोहिनी बोबडे,व इतर नगरसेविका प्रामुख्याने उपस्थित होत्या.
