ढाणकी निंगनुर फुलसावंगी रोडवरील २ पैकी 1 महत्वाचा पूल रहदारी साठी खुला सर्वसामान्याना यामुळे मिळाला दिलासा

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

दैनदिन जीवन जगत असताना मानवाच्या अन्नवस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजा आहेच त्या शिवाय दळन वळण ही व्यवस्था सुद्धा तीतकीच महत्वाची समजल्या जाते नुकताच पावसाळा सुरु झाला आणि बघता बघता एका महिन्याचा कालावधी निघून गेला पण पाऊसमानाने ज्या प्रमाणे आपले रुद्र रूप दाखवायला पाहिजे अर्थातच ज्याला मुसळधार कोसळधार म्हणतो त्या प्रमाणात वरुणराजाने आपले रुद्र रूप या महिन्यात तरी दाखविले नसले तरी येत्या काळात निसर्गाचे पावसाच्या रुपात नक्कीच रुद्र रूप पाहायला मिळेल एवढे नक्की

त्याला अनुसरून या पुलाचे अर्धवट कामाची बातमी दिनांक १६ मे रोजी संबंधित होणारी अडचण प्रकाशित केली होती मेट आणि निंगनुर फुलसावंगी व ढाणकी चि दळण वळण व्यवस्था ही या पुलावरून होत असते विशेष करून कोप्रा[खु] व कृष्णापूर येथील नाल्याचा संगम होऊन इथे खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येतो आणि नाल्याला पूर आल्यास येथे लोकांची गैरसोय होत होती आणि नाल्यापलीकडील शेतकऱ्याना शेतावर जाण्यासाठी प्रचंड त्रास होत होता व गरोदर महिलांना लहान बाळाना इतर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येण्यास नक्कीच सुकर होईल पण मागील वर्षी येथील जुन्या पुलास तोडून नवीन काम हाती घेतले होते पण पूर्ण झाले नव्हते त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास झाला विशेष करून दुभत्या जनावरांचे दूध आणणे सुकर झाले आहे अतिरिक्त पाऊस झाल्यास या ठिकाणी होणारी हेळसांड थांबली तर दुसऱ्यापुलाचे बांधकाम हे अत्यंत वेगवान पद्धतीने सुरु असून तो लगेच खुला होऊन जनतेच्या रहदारीसाठी खुला होईल आणि जनतेला दिलासा मिळेल असे चित्र चालू असलेल्या कामावरून दिसते‌.