
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)
या वर्षी तालुक्यात कधी नव्हे एवढा प्रचंड पाऊस बरसला.सध्या ९७५ मी मी पावसाची नोंद झाली असताना सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडून ही ओला दुष्काळ घोषीत होईल की नाही याची मात्र शास्वती आजही राळेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना नाही.कारण अतिवृष्टी चे निकषांनुसार सलग ६५ मी.मी.पावसाची नोंद च नसल्याने,प्रशासकीय पातळीवर ही घोषणा सध्या तरी अशक्यप्राय दिसत आहेत.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने धुवांधार बॅटींग केल्यानंतर हाता तोंडाशी आलेली पीके सडण्यास,गळण्यास,सोयाबीन च्या शेंगाना कोंब फुटून पार सत्यानाश झाला आहे.
सुरुवातीला पाऊस शेती साठी आवश्यक तेवढा च पडला. मध्यंतरी दोनदा पावसाने विश्रांती घेतल्या ने निंदण,डवरण,फवारणी सह मशागती ची कामे कमी खर्चात आटोपल्याने ,आनंदात आलेला शेतकरी सप्टेंबर महिन्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे रडकुंडीला आला आहे. सध्या कपाशी सह सोयाबीन पिकाची परिस्थिती अतीशय चिंताजनक असून शेतकरी आता बस झाले रे बा.अशी आर्त हाक मारत आहेत.तर दुसरीकडे झालेल्या नुकसानी ची पाहणी करुन,पंचनामे करावे व शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी या साठी ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव,मनसे,भाजपा सह अन्य मान्यवरांनी प्रशासना कडे तक्रार निवेदन देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.राळेगांव तालुक्यात दरवर्षी ६०० ते ७०० मी मी बरसणारा पाऊस यंदा मात्र सरासरी पेक्षा जास्त ९७५ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे हे विशेष तरी शेतकरी सरकारकडे त्यांच्या नुकसानीची भरपाई करून द्यावी अशी मागणी करत आहे यावर्षी झालेल्या नासाडी कडे सरकार मायबाप याकडे लक्ष देतील का.
