ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे तालुकास्तरीय आरोग्य मेळावा संपन्न,तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते मोफत तपासणी व औषधी वाटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त केंद्र शासन पुरस्कृत भव्य तालुकास्तरीय आरोग्य शिबिराचे आयोजन ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे करण्यात आले .
तालुक्यातील जनते करिता शुक्रवार दि .22 एप्रिल रोजी विविध आजाराचे निदानावर उपचार व मोफत तपासणी करून औषधी वाटप तसेच “डिजिटल हेल्थ आयडी कार्ड, आयुष्मान भारत कार्ड लाभार्थ्यांना देण्यात आले .
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन राळेगाव विधानसभेचे आमदार प्रा डॉ अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ही रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले तर प्रमुख उपस्थीती उपविभागीय अधिकारी शैलेश काळे,गटविकास अधिकारी मडावी,ठाणेदार संजय चौभे,तालुका आरोग्य अधिकारी पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरांजनदादा कोल्हे,सभापती प्रशांत तायडे,डॉ कुणाल भोयर,माजी जी,प सदस्य सौ प्रीती काकडे,माजी नगराध्यक्ष बबन भोंगारे,सामाजिक कार्यकर्ता संजय काकडे,संगीप तेलंगे,गजानन लढी, विवेक दौलतकर,डॉ ओंकार,डॉ कोकरे
हे होते.उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या आरोग्य मेळाव्यात विविध आजाराचे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.त्वचारोग तज्ञ तसेच विविध तज्ज्ञांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करण्यात आली व मोफत औषधी देण्यात आले तसेच इतरही विविध आजाराचे निदान व उपचार करण्यात आले तसेच
वृत्तलिखाना पर्यंत 1055 रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती या आरोग्य मेळाव्यात हजारोच्या संख्येने रुग्ण उपस्थीत होते या आरोग्य शिबिर शिबिराचे सुत्रसंचालन कविता इंगड यांनी केले,
कार्यक्रमात शहरातील विविध मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका राळेगाव, सर्व समुदाय आरोग्य अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी तालुका राळेगाव तसेच लाभार्थ्यांसाठी व रुग्णांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था सुद्धा करण्यात आळी होती.