
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
लहान मुलींनी समाजात बिनधास्तपणे फिरावे, असा वातावरण तयार झाले पाहिजे. तसे होत नसेल तर कुठेतरी चुकते आहे, हे लक्षात घेऊन कडक भूमिका घेण्याची गरज आहे.
मारेगाव तालुक्यातील पहापळ येथे अल्पवयीन मुलीवर मारोती मधुकर भेंडाळे या आरोपीने बलात्कार केला या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जावा.या खटल्यासाठी उज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी व आरोपीवर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मारेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे. यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख संजय आवारी, शिवसेना संघटक सुनिल गेडाम, नगराध्यक्ष डॉ.मनिष मस्की, डॉ.सपना केलोंढे, करण किंगरे, जय सिडाणा यांच्यासह पहापळ येथील नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने निवेदन सादर करताना उपस्थित होते.
