खैरी येथे कापूस खरेदीचा शुभारंभ

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील खैरे 20ऑक्टोबरला रिशी जिनिंग मध्ये कापूस करण्याचा शुभारंभ करण्यात आला. प्रकाश वाईट गोल्ड प्रा. लि. हिंगणघाट यांनी शेतकरी संजय जगधरे व हरीदासजी हरबडे यांच्या बैलबंडी चे पूजन करून मोठी 31 वाहने व दोन बैलबंडी यांना सरसकट 7245 रुपये भाव दिला. या कापूस खरेदीच्या शुभारंभ प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्तव्यदक्ष सभापती प्रफुलभाऊ मानकर, रविभाऊ निवल, महेंद्रजी बोथरा, कापूस खरेदीदार ओमप्रकाश डालिया, प्रणय डालिया, रिशी जिनिंग चे मालक कीर्ती शेठ, कृषी उत्पन्न बाजार समितीची केंद्रप्रमुख कोवे साहेब , मापारी बंडोजी नागपुरे, कापूस अडते सुरेश शेठ झामड, धनराजजी झामड , आनंदरावजी बोंदरे, विनोदराव भन्साली, अनीजी झाडे, सुनीलराव जयस्वाल, विवेकराव भेदुरकर, गजाननराव ठाकरे पांडुरंगजी बोडे, व इतर कापूस अडते व शेतकरी उपस्थित होते व शेतकरी बांधव असाच वाडी चा भाव राहो अशी अपेक्षा करत आहे.