कित्येक वर्षापासून पांढरकवडा मेटीखेडा बसफेरी बंद चं?

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

अतिशय महत्वाचा,खूप रहदारी च्या पांढरकवडा, मेटीखेडा राज्य मार्गावर कित्येक वर्षांपासून राळेगांव आगाराची बस फेरी बंद च असल्याने प्रवाशांना नाईलाजाने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे हे विशेष.
एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या न्यायीक मागण्यांसाठी प्रदिर्घ “बंद” अख्खा महाराष्ट्रात ऐन दिवाळी सणापासून पुकारत जवळपास चार महिन्याच्या वर लढा दिला.
त्या नंतर यात कोणाचा लाभ? कोणाचा तोटा? हा अभ्यासाचा विषय ठरेल.
या संप काळात एस.टी.वर अवलंबून असणारा प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहतूकी कडे वळला आहे.
आज बहुतांश बस आगार सुरु झाले.बस सेवा पुर्वपदावर येत असताना हव्या त्या सोई सुविधा सवलती मात्र प्रवाशांना मिळत नाही.
राळेगांव आगाराची ग्रामीण बस सेवा बंद चं असून यामुळे आजही प्रवासी ऑटो,काळी पिवळी,क्रुझर,मिनीडोर सह मिळेल त्या खाजगी वाहनाने प्रवास करत आहे.
पांढरकवडा मेटीखेडा या राज्य मार्गावर गेल्या कित्येक वर्षांपासून बस फेरी का नाहीत? याचा अभ्यास यवतमाळ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करु नये याचं च आश्चर्य वाटत आहे.
आजही प्रवाश्यांची पहिली पसंती एस.टी.लाच आहे.कारण सुरक्षित प्रवास,वाजवी प्रवासभाडे या साठी कर्मचाऱ्यांची अरेरावी सुध्दा प्रवासी ऐकून घेतोय.राळेगांव आगार हा नेहमीच उत्पन्न देण्यात अग्रेसर राहीला होता. आजही प्रमुख मार्ग व ग्रामीण मार्गावर बसफेऱ्या वाढविल्यास जुनं गतवैभव राळेगांव आगाराला निश्चितच मिळेल पण याच सोबत प्रवाश्यांची सौजन्यपूर्ण वागणूक देखील अत्यावश्यक च आहे.