राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सर्व तालुक्याला पावसाने झोडपून काढले शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच तालुक्यातील काही घरांची सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशातच सावनेर येथील विद्युत रोहित्र हे पाच ते सहा दिवसांपासून बंद आहे या गोष्टिची माहिती झाडगाव विद्युत वितरण कंपनीच्या कनिष्ठ उप अभियंता यांना भ्रमणध्वनीवरून याची माहिती देण्यात आली अजुनही विद्युत रोहित्र हे बसविण्यात आले नाही गावातील पिठ गिरण्या या पाच ते सहा दिवसांपासून बंद असून नागरिकांना बाहेर गावी जाऊन धान्य दळून आनन्याची वेळ आली तसेच गावांमध्ये पान्याची टाकी उभारून त्या टाकिद्वारे संपूर्ण गावाला पाणीपुरवठा केला जातो पण विद्युत रोहित्र च बंद असल्याने गावकऱ्यांना दुषित पाणी पिन्याची वेळ आली आहे दुषित पाण्यामुळे एक ना अनेक आजार होन्याची शक्यता नाकारता येत नाही पावसाळ्याचे दिवस रात्री घराबाहेर निघने मुश्किल झाले आहे गावातील संपूर्ण लाईट बंद असल्याने साप,विंचू चावन्याच्या भितीने नागरिक घराबाहेर पडताना दिसत नाही . सावनेर येथील विद्युत रोहित्र लवकरात लवकर दुरस्ती करून द्यावे अशी मागणी गावकरी करत आहे
