अज्ञात चोरट्याने घराच्या आत प्रवेश करून डब्यातील केले 32 हजार रु लंपास,वडकी येथील घटना

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

वडकी पोलीस स्टेशन येथील वार्ड क्र 4 येथे अज्ञात चोरट्याने दुपारच्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहून घरात प्रवेश केला व स्टीलच्या डब्यातील 32 हजार रु लंपास केल्याची घडली,
मिळालेल्या माहितीनुसार यातील कोणीतरी अज्ञात चोरट्याने तक्रारदार रत्नाकर नत्थुजी फुटाणे वय 38 वर्ष रा वार्ड क्र 4 वडकी यांचे घराचा उघडा असलेला दरवाजा ढकलून आत प्रवेश करून घरातील स्वयंपाक खोलीत असलेल्या स्टीलच्या डब्यात ठेवून असलेले नगदी 32 हजार रु डब्यासाहित चोरून नेले घरात चोरी झाल्याचे माहिती होताच याप्रकरणी रत्नाकर फुटाणे यांनी दि 8 नोव्हेम्बर 2021 रोजी वडकी पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 380 अंतर्गत सदरचा गुन्हा नोंद केला असल्याची माहिती पोलिसांकडून आज दि 9 नोव्हेम्बर 2021 रोजी देण्यात आली आहे,या घटनेचा पुढील तपास वडकी बिटचे रमेश मेश्राम सह किरण दासरवार करीत आहे.