
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
मागील काही दिवसांमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढला आहे विषयुक्त खाण्याच्या पदार्थामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दशपर्णीचा वापर पिकांवर केल्यास सेंद्रिय भाजीपाला व इतर पिके मिळून आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती म्हणून दशपर्णी अर्क चे प्रातेक्षिक करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन, वरोरा . ग्रामीण कृषी जागरूकता आणि ओदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिदुत कु. तनया विलास मसराम हीने रावेरी परिसरातील शेतकऱ्यामध्ये जनजागृती केली.
