सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य,पुसद येथील सरपंच उपोषणास जाहीर पाठींबा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेच्या पुसद तालुका जिल्हा यवतमाळ कार्यकारिणीच्या वतीने पुसद तालुक्यातील ग्रामपंचायत चे स्ट्रीट लाईट ऐन दिवाळीत बंद केले ते चालु कारावे म्हणून व महावितरणच्या मनमानी कारभाराच्या विरोधात पुसद तालुक्यातील सर्व सरपंच यांनी आमरण उपोषण आज सकाळी अकरा वाजेपासून सुरू केलेले आहे पुसद तालुका सरपंच सेवा संघ तालुका कार्यकारिणी उपोषण सुरू केले आहे या उपोषणास सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत असून पंचायत समिती तालुका पुसद जिल्हा यवतमाळ तसेच कार्यकारी अभियंता महावितरण पुसद विभाग यांच्यावतीने उपोषणकर्त्यांची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही किंवा कोणताही अधिकारी अधिकारी उपोषण कर्ते सरपंच यांचे भेटीस गेले नाही त्याबद्दल सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांचेवतीने जाहीर निषेध करत आहोत….