
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधून असलेल्या एकबुर्जी भांब रावेरी सोसायटीच्या एकतर्फी लागलेल्या निकालानंतर आज दिनांक 4/7/2022 रोजी परत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली.या निवडीमध्ये या सोसायटीत निवडून आलेले भांबचे संचालक श्री कवडू उर्फ दुर्गेश शिवणकर यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी एकबुर्जी या गावाचे गजानन झाडे यांची सुद्धा अविरोध निवड करण्यात आली.या निवडीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी ए .एस. भगत व सोसायटीचे सचिव म्हणून चंद्रकांत
गोहणे उपस्थित होते. या दरम्यान सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक व पॅनेलचे नेतृत्व श्री राजेंद्र तेलंगे , जयवंत झाडे, पंजाबराव हिवरकर, विनोद कुबडे,सतिश कोरडे, गजेंद्र चौधरी, सौ चंदाताई धोटे, सौ.निता भुडे, नारायण मडावी, विजय पिंपरे, रमेश शिवरकर,सह सर्व संचालक उपस्थित होते.या अचानक समयसूचकता बाळगून केलेल्या निवडीमुळे भांब,एकबुर्जी सह रावेरी गावात आनंदाचे वातावरण पसरले असून तिन्ही गावातील लोकांनी नविन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
