
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव यवतमाळ मार्गावरील उमरी गावालगत वादाफळे कॉलेज जवळ उभ्या ट्रक ला मोटारसायकल धडकली. यात मोटारसायकल स्वार दोन्ही जणांचा जागीच मृत्यू झाला. संजय जयस्वाल ( 48), लहान्या उर्फ आकाश नानाजी मेश्राम (29)अशी मृतकांची नावे आहे.
हा अपघात आज ( दी. 21 ) पहाटे घडला.
राळेगाव यवतमाळ मार्गांवर अपघातांची शृंखला थांबण्याचे नाव घेत नाही. यात दोन जणांच्या मृत्यची आज भर पडली. या अपघातात शेजारी दारू च्या बॉटल आढळून आल्या. ट्रक क्र. TS 01UC 5614 या क्रमांकाचा ट्रक रस्त्यावर उभा होता. MH-29 Ah 5026 क्रमांकाच्या पल्सर दुचाकीने कलमं कडून हे दुचाकी स्वार राळेगाव कडे येतं होते . रस्त्यावर उभ्या असणाऱ्या ट्रक वर पहाटे 5 च्या दरम्यान ते धडकले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी फिरायला जाणार्यांना ही घटना निदर्शनास आली. याची माहिती होताच बघ्याची प्रचंड गर्दी अपघात स्थळी दाखल झाली. ही टक्कर एव्हडी भीषण होती कीं दोन्ही तरुण जागीच ठार झाले. मृतकांना शवविचेदन करीता ग्रामीण रुग्णालय कळंब येथे नेण्यात आले.
युवकांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ वेक्त होतं आहे. राळेगाव पोलीस विभागाचे अवैध्य दारू विक्री कडे सोईस्कर दुर्लक्ष होतं असल्याची किनार या घटनेला असल्याची चर्चा आहे.
