
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वरूड जहाँगीर हे गाव राळेगाववरून दहा किलोमीटर अंतरावर असून अतिशय महत्वाच्या कामासाठी किंवा कार्यालयीन कामासाठी राळेगावलाच जावे लागते.अशातच मागील काही वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून या रोडचे काम करण्यात आले होते.तेव्हां या मार्गावरील वाटसरूनी सुटकेचा श्वास सोडला होता. परंतु कालांतराने हा रस्ता वाढत्या वाहतुकीमुळे अत्यंत खराब झाला असून अशातच या रस्त्याचे काम मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झाल्याचे दिसून आले असून रस्त्याच्या दुतर्फा मशीनच्या सहाय्याने माती टाकून दबाई करून लेव्हल मारणे सुद्धा सुरू झाले आहे परंतु त्यावर गीट्टा टाकून दबाई न केल्यास दोन्ही बाजूची माती मध्यभागी येऊन चिखल होऊन दोन चाकी वाहने स्लीप होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून लोकांची अत्यंत हाल अपेष्टा पाहता या कामाला पाहिजे त्या पद्धतीने गती मिळाली नसून या पावसाळ्याअगोदर हे काम पूर्णत्वास जाईल असे वाटत नसून हे काम जर पावसाळ्याअगोदर पूर्णत्वास गेले नाही तर वरूड ते पिंपळखुटी पर्यंत प्रवासी वाहतूक करणाऱ्या, आणि वाटसरूचे खुपच हाल होणार आहे अशातच राळेगावला वरूडची लोकं कार्यालयीन कामासाठी मोठ्या प्रमाणात जात असल्यामुळे वरूडवासीयांचे जास्तीत जास्त हाल होणार आहे.अशातच या परिसरातील लोकप्रतिनिधींनी या कामाला गती देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे सोबतच वरूड जहांगीर ग्रामपंचायत प्रशासनाने सुद्धा संबंधित विभागासोबत पत्रव्यवहार करून या कामाला गती देण्यासाठी सहकार्य करावे.त्याचप्रमाणे या मतदारसंघातील ईतर आजी,माजी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.अनेक दिवसांपासून या रस्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या वाहनांची ये-जा झाली असताना हा रस्ता त्यांच्या निदर्शनास पडू नये ही तर मतदार संघातील मतदारांची चेष्टाच म्हणावी लागेल. करीता या रस्त्याच्या कामाला गती देऊन ताबडतोब पूर्ण करण्याची मागणी खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावनसिंग वडते सर, वसंत जिनिंगचे संचालक रामधन राठोड, जनार्दन कडू, सदानंद भोरे,किरण निमट, पुनेश्वर उईके , भानुदास चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
