महा डिजिटल मीडिया असोशियन चे तालुका अध्यक्ष, तालुका पत्रकार संघटनेचे सदस्य स्वप्नीलबाबु वटाणे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण [परिसरातील मित्र परिवाराच्या वतीने आयोजन ]


राळेगाव राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

आजकाल वाढदिवसानिमित्त भर रस्त्यावर केप कापून, तो चेहऱ्याला फासून, फटाक्‍यांची आतषबाजी करणाऱ्या तरुणांकडे पाहता, पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरू असल्याचे दिसून येते. मात्र स्वत:च्या वाढदिवशी असे काही न करता व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वप्नील वटाणे मित्र परिवाराच्या वतीने गावात स्वच्छता करून वृक्षारोपण केले. निसर्गाची झपाटय़ाने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेले असले तरी रस्त्यालगत वृक्षांची वाणवा आहे. तर दुसरीकडे परिसरात दररोज येणाऱ्या हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडॉक्साइड वायूचाही परिणाम होत आहे.
तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी महा डिजिटल मीडिया असोशियन चे तालुका अधक्ष्य स्वप्नील वटाणे व त्यांच्या मित्रांनी वाढदिसानिमित्त वृक्षारोपण केले कारोना काळात ऑक्सिजन काय असते याची खरी किंमत लोकांना कळली हेच ध्येय ठेवून वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केले तालुका अध्यक्ष स्वप्निल वटाणे यांनी आपल्या गावात वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संतुलन बिघडू नये यासाठी वृक्षारोपण केले
या कार्यक्रमासाठी मयूर आडे सचिन कुमारे नितीन ठाकरे लक्ष्मण खुणकर वैभव कुमरे अमर कुळसंगेअविनाश कुळसंगे प्रमोद ठाकरे धनंजय वटाणे लुकेश जुमनके अमोल राऊत अक्षय पारेकर शुभम मडावी जीवन नांदे विजय मेश्राम गावातील नागरिक व युवक उपस्थित होते.