
राळेगाव तालुक्यात मनसे ची घोडदौड कायम आहे. नेत्याच्या गावात झेंडा रोउन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युवा शिलेदारांनी आज नवा इतिहास रचला. शाखा स्थापने सोबतच मनसे शाखा फलकाचे अनावरण आज झाले. पुढील काळात राळेगाव विभागात मनसे राजकीय वर्तुळात चमत्कार घडवणार असल्याची चिन्ह उमटू लागली आहे.
मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवुन तालुक्यातील युवक मनसेमध्ये प्रवेश घेवुन नवनिर्माणाचा झेंडा हाती घेत आहेत.राळेगाव तालुक्यातील सावनेर येथे शेकडो युवकांनी मनसेमध्ये प्रवेश घेवुन शाखा स्थापन केली आज सावनेर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा फलकाचे अनावरण मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मनविसे तालुकाध्यक्ष शैलेशभाऊ आडे मनसे वाहतूक सेना अध्यक्ष आरिफभाऊ शेख, गणेश काकडे, राहुल गोबाडे, जगदीश गोबाडे, अक्षय निकम, विठ्ठल जोगी, संदीप गुरनुले, मंगेश मोहुर्ले, गणेश मांदाडे, ऋषिकेश वाघाडे मज्जित सैयद रहीम शेख यशवंत घरघडे करण नेहरे (शाखा अध्यक्ष) सौरभ तुळसकर कुणाल घरघडे प्रशांत पवार नागेश देकणे शुभम नेहारे हर्षद गेडाम बशीर सैयद सुदर्शन उईके अमित उईक ऋतिक जमूणकर पवन दडांजे वित्तल शेंडे सचिन शेंडे रवी मडावी करण कुमरे योगेश कुमरे आकाश नहरे गौरव अत्राम विजय नेहरे कुणाल शेंडे तुषार शेंडे आणि असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
