
मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा सर्व स्थरातून निषेध…
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील मानवतेला काळीमा फासत अवघ्या सहा वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचा सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन च्या वतीने निषेध करण्यात आला असून त्या वासनांध नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मारेगाव तालुक्यातील पहापळ गावातील दि. ९ मे रोजी सायंकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान हि घटना घडली. पोलीस सूत्राच्या माहितीनुसार पीडित मुलगी आजी सोबत शौचास गेली असताना राक्षसी प्रवृत्तीच्या वासनांध इसमाने तिला शेतशिवारात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची पीडित मुलीच्या वडिलांनी मारेगाव पोलिस ठाण्यातआरोपी विरोधात फिर्याद दाखल केली. या किळसवाण्या घटनेने मारेगाव तालुका हादरला असून, सर्व स्थरातून निषेध करण्यात येत आहे, या नराधमाला फाशी च्या शिक्षेची मागणी सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन संघटना च्या अध्यक्ष किरणताई देरकर यांच्या सह जवळपास १०० प्रतिष्ठित महिलांनी अत्याचार पीडित बालिका व तिच्या आई वडिलांची भेट घेतली. सदर खटला जलदगती न्यायालयात चालून आरोपींस फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी प्रचंड आक्रमक झाल्या असून कीरण ताई देरकर सुषमाताई काळे ईंदुताई कीन्हेकर, डॉ.सपना केलोडे , संध्या पोटे, माधुरी नगराळे, जीजाताई वरारकर ऍड हुमेरा खान, सुरेखा ढेंगळे, वृषाली खानझोडे, कविता सोयाम, अर्चना पीदुरकर, कविता मडावी, कमल नाखवे इत्यादी महिला उपस्थित होत्या.
