स्मॉल वंडर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडकी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

वृक्षारोपणात विद्यार्थ्यांची भुमिका महत्वाची मुख्याध्यापिका मंजुषा सागर यांचे प्रतिपादन.

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील वडकी येथील स्मॉल वंडर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम दिनांक ०९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पार पडला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका, प्रमुख अतिथी, शिक्षक वृंद, शाळेतील विद्यार्थी व कर्मचारी यांनी मिळून अनेक प्रकारची झाडे लावून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा सागर यांनी प्रतिपादन करतांना आपल्या भारताची लोकसंख्या जसजशी वाढत आहे तसतशी झाडेसुद्धा कमी होत आहेत. त्याचा परिणाम पर्यावरणावर होत असल्याचे आपण पाहत आहोत. जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली गेली त्यामुळे उष्णता वाढली. पावसाचे प्रमाण कमी झाले. जमिनीची धूप होऊन ती नापीक झाली. दुष्काळाचे प्रमाण वाढले. परिणामी हवेच्या प्रदुषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावं लागत आहे. म्हणून ‘झाडे लावा झाडे जगवा’ ही संकल्पना राबविली जात आहे. व प्रत्येक वर्षी त्याप्रमाणे वृक्षारोपण पण केलं जातं व वृक्षलागवडीची वृक्षांची संख्या सरकारी आकडेवारीनुसार लाखोंवर सांगितली जाते, पण जी लाखो झाडे लावली जातात, त्याच्यातली जगतात किती? किंवा जगविण्याचे प्रयत्न किती केले जातात, याचा विचार व्हायला हवा! फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही, तर त्यांचं संवर्धनसुद्धा करणं, ही काळाची गरज आहे. दरवर्षी झाडे लावली जातात; पण झाडे लावण्याचे खड्डे तेच असतात, फक्त झाडे बदलतात. असे चित्र खूप वेळेस पाहायला मिळते. म्हणून जसे झाड लावतो तसे त्याचे संवर्धन करून त्याला मोठे करण्यासाठी प्रयत्न करावे, जेणेकरून आपण केलेल्या वृक्षारोपणाची वृक्ष पुढच्या काळात रूबाबात डोलतांना आपल्याला पाहायला मिळेल. या प्रकारे विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी मंगेश पवार, रोमहर्षण फुटाणे शिक्षकवृंद अहमद शेख, शंकर मालखेडे, नितीन गवळी, अतुल भेदुरकर, अक्षय वानखेडे, स्नेहा गौरकार, शन्नो शेख, निता फुटाणे, विजय फुलकर, प्रेम इंगोले, कोरडे शाळेतील विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.