
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आंजी येथे पाच ते सहा दारू विक्रेते आहे आंजी हे गाव राळेगाव पोलिस स्टेशनच्या शेवटच्या टोकाला येते या गावांमध्ये पाच ते सहा वर्षांपूर्वी एक दोन दारू विक्रेते होते गावातील लहान्या पासून तर मोठ्या पर्यंत या व्यसनाच्या आदिन गेले होते रोज या गावात छोटे मोठे वाद विवांद चालत होते अशातच आंजी येथील काही महिला व युवक यांनी राळेगाव पोलिस स्टेशन गाटुन या गावातील देशी दारूचे दुकाने राळेगाव पोलिस यांनी बंद केले होते गावातील वातावरण शांत झाले होते पण अचानक सतत दोन वर्षे करोना या महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेले मग कमी वेळात जास्त पैसा कसा कमवायचा तर आंजी गावातील काही आंबट शौकिनांनी देशी दारुचे दुकान सुरू केले विशेष म्हणजे एक किंवा दोन नाही तर एवढ्या छोट्याशा गावात पाच ते सहा दारूची दुकाने आहेत यात चक्क जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेजवळ दारूची विक्री केल्या जात आहे यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे हे दारु विक्रेते एवढे मुजोर झाले आहे कि गावातील काही नागरिकांसोबत वाद पण घालत असतात असे काही नागरिकांचे मनने आहेत या छोट्याशा गावात पाच ते सहा दारूची दुकाने चालण्यासाठी कोनाचा आशीर्वाद आहे हे अजून ही आंजी येथील नागरिकांना समजले नाही तसेच वाठोडा या गावांमध्ये दारूची विक्री मोठ्या प्रमाणात आहे बंदच्या दिवशी या गावाला जत्रेचे स्वरूप येतात या दोन्ही गावाच्या दारू विक्रेते यांना कोनाचा आशीर्वाद आहे हे दारु विक्रेते गावातील लोकांना धमकवन्यात खूप पुढे आहे या दोन्ही गावांतील दारूची दुकाने राळेगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार यांनी लक्ष देउन बंद करावी अशी मागणी आंजी व वाठोडा या गावातील महिला व नागरिकांची आहे.
