रिधोरा येथील प्रगतिशील शेतकरी हरिष काळे यांचा सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी यांचा सत्कार सविस्तर वृत्त असे अँड. प्रफुल्लभाऊ मानकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राळेगाव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार दि.१२ फेब्रुवारी रोजी बाजार समिती मध्ये घेण्यात आला. रिधोरा येथील पपई उत्पादक शेतकरी हरिष मारोतराव काळे यांनी पाच एकर पपईचे विक्रमी उत्पादन घेतले तर रिधोरा गावालगत असलेल्या वाढोणा बाजार येथील शेतकरी उमेश अंबादासजी झाडे यांनी एक ते दिड एकर मध्ये द्राक्ष लागवड केली तर संदीप निळखंट हाडे यांनी एक ते दोन एकर मध्ये सपरचंदाची लागवड करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एक वेगळा अनुभव घ्यायला सांगितले आज रिधोरा परिसरातील वरील तीनही शेतकऱ्यांन पैकी एका शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले तर उर्वरित दोन शेतकरी विक्रमी उत्पादन घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. यांच्या सह इतरही शेतकऱ्यांचा सत्कार माणिकरावजी ठाकरे माजी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी,वसंतरावजी पुरके माजी शिक्षण मंत्री (म.रा.),अँड प्रफुल्लभाऊ मानकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर डॉ. सतिश निचळ वरिष्ठ पैदासकार,सोयाबीन संशोधन केंद्र पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अमरावती यांनी सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर डॉ एकनाथ वैद्य वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, तुर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी तुर उत्पादन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला रिधोरा सह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

        प्रतिक्रिया

कापूस, तुर,सोयाबीन या पिकावर लक्ष कमी देवुन फळबाग लागवड करणे गरजेचे आहे. कारण कापूस, तुर,सोयाबीन या पिकामध्ये खूप कमी पैसे मिळतात मी पाच एकर पपईची लागवड केली होती यामध्ये ५० लाखाचे उत्पादन घेतले आहे. तर केळीची लागवड केली यामध्ये सुध्दा मी १५ लाखाचे उत्पादन घेतले आहे. तर अजूनही माझ्या शेतात ऊस, पपई, केळी, हळद, मश्रूम ची लागवड केली आहे.
(हरीष काळे शेतकरी रिधोरा)