
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
मारेगाव तालुक्यातील वेगाव येथे मागील सहा दिवसापूर्वी जिल्हा परिषद सदस्यास दगडाने मारहाण करणारा संशायित आरोपी राहुल सूर गुरुवारला रात्री त्याच्या घरून पोलिसांनी ताब्यात घेतले.आज दि. १२नोव्हेंबर रोज शुक्रवार ला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची यवतमाळ जेलात रवानगी करण्यात आली.मारेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर यांना वेगाव येथे मागील सहा दिवसापूर्वी मारेगाव येथील युवक राहुल सूर याने दगडाने मारहाण करून घटनास्थळारून पसार झाला होता. जखमी देरकर यांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी यांनी पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे उपचार करण्याचा सल्ला दिला होता. चंद्रपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार करून त्यांच्या डोक्याजवळ सात टाके लागले होते.पायालाही इजा झाली होती. ५नोव्हेंबर रोजी पोलिस ठाणे गाठत राहुल सुर विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारी नुसार सूर याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरविले.दरम्यान संशायितांने तब्बल सात दिवस नागपूर येथे लॉज मध्ये ठाण मांडले होते.अखेर जवळची रक्कम संपताच तब्बल सात दिवसानंतर गुरुवारला रात्री राहुल सूर हा मारेगाव शांती नगर स्थित घरी आला होता.मारेगाव पोलीस पाळत ठेवून असतांना मारेगाव पोलीस पथकाने छापा टाकीत ताब्यात घेतले. सूर यास पोलिसांनी आज शुक्रवारला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.
