
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
विधानसभा क्षेत्रात परतीच्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.सरकारने राळेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके व तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने एका निवेदनाद्वारे केली.अतीवृष्टीमुळे राळेगाव विधानसभा मतदार संघातील झालेल्या शेतकऱ्यांचे पीकांचे नुकसान झाले त्यामुळे पंचनामे करुन नुकसान भरपाई व पीक विमा मंजुर करुन त्वरीत देण्यात यावे व राळेगाव विधानसभा मतदार संघातील सर्व ग्रामपंचायतीचा विद्युत पुरवठा शासनाने खंडीत केला असुन सर्व गावे अंधारात असलेल्या शासनाने विद्युत बिलाचा भरणा करुन विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच राळेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी नायब तहसीलदार श्री.बदकी यांचेकडे निवेदन सादर करण्यात आले .यावर्षी अधिक पाऊस झाल्याने तसेच सोयाबीन काढण्याची तयारी सुरु असताना सुद्धा प्रचंड पाऊस पडत असल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.अतिपावसात कापसाचे पीक सुद्धा काळवंडले असुन हा हंगाम सुद्धा शेतकऱ्यासाठी नुकसान देणारा ठरला आहे .परतीचे पावसाने अनेक शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले असुन उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्याने कर्ज फेडायचे कसे या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे .तेव्हा राळेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करुन शासनाने शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंतरावजी पुरके,कृ .उ.बा.स.राळेगाव सभापती प्रफुलभाऊ मानकर , कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव उपसभापती पुरुषोत्तमरावजी निमरट, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी प्रवक्ता अरविंदभाऊ वाढोणकर, जानरावभाऊ गिरी,तालुका काँग्रेस कमिटी राळेगाव अध्यक्ष अरविंदभाऊ फुटाणे, राळेगाव शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीपभाऊ ठुणे,दिपकभाऊ देशमुख,माजी सभापती प्रवीणभाऊ कोकाटे,माजी उपसभापती निलेशभाऊ रोठे, खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंदभाऊ इंगोले, बालाजी गारघाटे, वामनरावजी हिवरकर,नथ्थुजी धोटे ,विलासराव हिवरकर,नरेशभाऊ कचवे, रामदासजी सरोदे,अमोलभाऊ शिंदे, रविन्द्रभाऊ खैरकार,दिपकभाऊ महाजन, विष्णूभाऊ टेकाम ,राजुभाऊ पुडके,सुनिलभाऊ भामकर, शेषरावजी निकोडे,किशोरभाऊ धामंदे,दिलीपभाऊ कन्नाके, श्रीकृष्णजी महाजन,अरुणभाऊ गाडगे, पुंडलिकराव आदे, अशोकरावजी गाऊत्रे, ,सैय्यद लियाकत अली, मंगेशजी पिंपरे,बादशहाभाई,महादेवराव तुरणकर,संजयभाऊ शेडमाके, अंकुशभाऊ मुनेश्वर,सचिनजी हुरकुंडे, प्रदीपभाऊ लोहकरे , मधुकरराव राजुरकर, पांडुरंगजी बोभाटे,दिपकभाऊ महाजन, विनोदराव नरड,गोविंदराव डाखरे,राजुभाऊ निकम, प्रकाशजी होरे,प्रफुलभाऊ तायवाडे, जितेंद्रभाऊ कहुरके,बी.यु.राऊत , मंगेशभाऊ राऊत,अशोकरावजी काचोळे , राजेन्द्रभाऊ तेलंगे,खुशालभाऊ रोहणकर, अरविंदभाऊ तामगाडगे, सुधाकरराव शिंदे, निलेशभाऊ रोठे, निलेशजी पिंपरे,विजयजी राठोड, सुरेशजी पेद्राम, मिलिंदभाऊ इंगोले,किरणभाऊ कुमरे,बंडूजी वेले,संदीपजी भट्टड,अफसर अली सैय्यद, , व अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.
