आमरण उपोषणाचा पाचवा दिवस राजकीय पुढारी व अधिकारी किती दिवस अंत पाहणार

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)

महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था राळेगांव च्या थकीत खातेदार व ठेवीदार यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस उलटून ही प्रशासनाचे वतीने हवी ती तळमळ दिसत नसल्याने उपोषणकर्ते संतप्त झाले आहेत. काल रात्री विजेचा कडकडाट,वादळ वारा,पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने उपोषणकर्ते जीव मुठीत घेऊन आडोशाला बसले होते. विद्यमान तहसीलदार डाँक्टर रविंद्र कानडजे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन सहाय्यक निबंधक राळेगांव यांना त्वरित तोडगा काढावा असे सांगितले.
या आधी सुध्दा यांनी आमरण उपोषण केले,मोर्चा काढला,आंदोलने झाली,तक्रार निवेदन देण्यात आले पण पदरात कोरडं आश्वासन पडले. शहरात अनेक समाज सेवक मोठे पणा करत शेखी मिरवितांना दिसतात,राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते देखील यांची समस्या सोडवण्यासाठी असमर्थ ठरत आहे हे विशेष..