विधवा महिलांच्या उत्थानासाठी लोकप्रतिनिधी नी विशेष घटक योजना निर्माण करुन महिला चे सक्षमीकरण केले पाहिजे – मधुसूदन कोवे गुरुजी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

जागतिक विधवा महिला दिनानिमित्त अंतरगाव ( कोपरी ) येथे ग्राम स्वराज्य महामंच आणि गावातील विधवा महिलांच्या प्रमुख श्रीमती सुनीता तोमर ग्राम पंचायत सदस्य यांनी “‘ विधवा महिला सन्मान कार्यशाळा “‘आयोजित केली होती.
या कार्यशाळेला उपस्थित मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच तसेच मा.प्रविण जी एंबडवार सरपंच अंतरगाव, श्रीमती आशा काळे,शायीस्ता खान सामाजिक कार्यकर्ते यवतमाळ आणि श्रीमती आशा उमरे जेष्ठ विधवा महिला श्री विनोद भाऊ पराते नितीन ठाकरे उपस्थित होते

महिलांच्या समस्या आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारे मानसं राहिली नाही आणि म्हणून शोषित पिडीत, विधवा घटस्फोटीत एकल महिला यांना प्रत्येक बाबतीत तोंड देण्यासाठी संघर्ष करावा लागतो म्हणून ही बाब सरकारने, आणि लोकप्रतिनिधी नी समजून घेतली पाहिजे.या साठी “‘विशेष घटक योजना”‘ चा प्लॅन केला पाहिजे असे मत मा मधुसूदन कोवे गुरुजी “‘विधवा महिला सन्मान कार्यशाळेत मांडले आहे.

जागतिक विधवा महिला दिनानिमित्त अंतरगाव कोपरी चिखली बाहेर गावातुन महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.ग्रामसेवक मॅडम अंतरगाव यांनी केले या कार्यक्रमाला सहकार्य सौ.पेंदोर श्रीमती ठाकरे ग्राम पंचायत कर्मचारी आणि गावातील महिलांनी सहकार्य केले आणि सर्व मार्गदर्शकांचे आभार श्रीमती सुनीता तोमर ग्राम पंचायत सदस्य यांनी मानले आहे.