प्राचार्य ताजने सर यांना दिला सेवानिवृत्ती समारंभ

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाषराव आनंदराव ताजने सर हे तेविस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवेतून निवृत्त झाले. ते सन १९९८ मध्ये हायस्कुल विभागात मराठी विषय शिक्षक म्हणून रूजू झाले होते. एकविस वर्षाची सहाय्यक शिक्षक म्हणून सेवा दिल्यानंतर ते मागील सतरा महिन्यापूर्वी विद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी सुत्रे सांभाळली होती त्यांची सहाय्यक शिक्षक व मुख्याध्यापक पदाची दोन्ही पदे अतिशय चांगली राहीली. ते दिनांक ३१/१०/२०२१ रोजी सेवेतून निवृत्त झाले त्यानिमित्त दिनांक १/११/२०२१ रोज रविवारला शालेय परिसरात संस्थेंचे अध्यक्ष दिलीपराव कोल्हे यांच्या हस्ते प्राचार्य सुभाषराव ताजने सर व त्यांच्या अर्धांगिनी सौ अनिताताउ सुभाषराव ताजने यांचा शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आशिषजी कोल्हे,सचिव रोशनजी कोल्हे,संचालक तथा जिल्हापरिषद सदस्य चित्तरंजनदादा कोल्हे,संचालक गुलाबराव महाजन,दिलीपराव देशपांडे, सुरेशराव गंधेवार,मारोतराव पाल मंचावर उपस्थित होते,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक तथा नवनियुक्त प्राचार्य विलासराव निमरड सर यांनी करून पुढील वाटचालीकरीता सरांना शुभेच्छा दिल्या सोबतच शाळेतील शिक्षक राजेशजी भोयर सर,रजंय चौधरी सर, सौ काळे मँडम,वडते सर यांनी सरांना भावी आयुष्यासाठी दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक मोहनराव बोरकर सर यांनी केले तर आभार राजेशजी भोयर सर यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे शिक्षक सर्वश्री विलासराव निमरड, रमेशराव टेंभेंकर,श्रावनसिंगजी वडते,दिगांबरराव बातुलवार, सौ काळे मँडम, रंजय चौधरी, वंदनाताई वाढोनकर, स्वातीताई नैताम, मोहनराव आत्राम, विशालजी मस्के मोहनराव बोरकर, वैशालीताई सातारकर, तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वाल्मिकराव कोल्हे,बाबुलालजी येसंबरे, विनोदराव शेलवटे उपस्थित होते,उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनींनी सरांना शुभेच्छा दिल्या.