

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव शहरातील घटना शुक्रवार दुपारी साडेबारा वाजता थोडगे लेआउट परिसरातील प्रदीप निकम यांच्या घरी ही घटना घडली प्रदीप निकम यांच्या घरी वरच्या मजल्यावर मायक्रोफायनान्स येथे काम करणारे एन रमेश. एन अच्युत. तेजा सत्ते. एन किरण . एन विजय. के लोकेश हे सहा भाडेकरू गेल्या पाच वर्षापासून राहात आहेत मायक्रो फायनान्स रक्कम त्यांच्याकडे असायची आज दुपारी बारा तीस वाजता तीन धडधाकट तरुण आम्ही पोलीस विभागाचे आहे असे सांगून त्या सर्वांकडे गांजा अफू असल्याचे तक्रार सांगून त्यांना मारहाण केली पोलीस खात्याची असल्यामुळे ते काहीही बोलू शकले नाही दरम्यान त्यांच्याकडे असलेले तीन लाख रुपये व मोबाईल घेऊन चोरट्यांनी पळ काढला इतक्यात एकाने घर मालकाला फोन लावून आमच्याकडे मारहाण करून पैसे लुटत असल्याचे सांगितले यावेळी घर मालक प्रदीप निकम हे घरी जेवण करत होते त्यांनी घाईघाईने बाहेर पडले असता बॅग घेऊन चोरटे पळ काढत असल्याचे त्यांनी बघितले बनावट पोलीस पांढऱ्या रंगाच्या चार चाकी गाडीने आले होते ते जात असताना चे फुटेज सीसीटीव्ही आले आहे मात्र ते पळून गेल्याने सध्या तरी पोलिसांच्या हाती लागले नाही मायक्रो फायनान्स मध्ये कार्यरत असलेले युवक हे आंध्र प्रदेशातील राय चूर येथील आहे त्यांना मारहाण केल्याने एक कमालीच्या दहशतीत आहे सर्वांची चौकशी पोलिस विभागाकडून सुरू असून आज राहता ठाण्याला अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराव दरणे यांनी भेट देऊन घटनेची पूर्ण माहिती घेतली आहे राळेगाव शहरात भरदिवसा दरोडा पडत असल्याने करीत असलेल्या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे घटनास्थळी ठाणेदार संजय चौबे सहाय्यक ठाणेदार विकास पाटील यांनी चौकशी सुरू केली आहे.
