
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक 11 फेब्रुवारी रोजी गान कोकिळा स्व. लता मंगेशकर व सिने अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्राचार्य मोहन देशमुख, उपप्राचार्य जितेंद्र जवादे, पर्यवेक्षक विजय कचरे व न्यू एज्युकेशन सोसायटी च्या सचिव सौं अर्चना धर्मे, यावेळी उपस्थित होत्या त्यानी यावेळी मनोगत वेक्त करतांना सांगितले की, संस्थेच्या भौतिक विकासासाठी व इमारत बांधणी करिता 1957 मध्ये स्व. रमेश देव यांनी त्याच्या पत्नी सौं. सीमा देव, व राजा गोसावी यांनी शाळेच्या मैदानावर नाटीका सादर करून कसे सहकार्य केले याबद्दलच्या आठवणीना उजाळा दिला व यावेळी गान कोकिळा स्व. लता मंगेशकर व सिने अभिनेते रमेश देव या दोन्ही महात्माना यावेळी संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
