भ्रष्ट सरकारच्या धोरणाने जनता त्रस्त , आघाडी सरकार सर्वच बाबतीत अपयशी : – आमदार प्रा डॉ. अशोक उईके

उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चाची धडक

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राज्य सरकारच्या धोरणाने राज्यातील जनता त्रस्त आहे. महाराष्ट्रातील जनतेशी बेईमानी करुन सत्तेत आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानी दोन मंत्र्यांनी राजीनामे दिलेल्या सामान्य माणसाला हवालदिल करणा-या दिलेल्या आश्वासनाकडे पाठपिरविणा-या वसुलीबाज सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही त्यांनी राजीनामा द्यावा असा आरोप राळेगांव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी जनआक्रोश आंदोलनाचे नेतृत्व करतांना उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले . जनआक्रोश मोर्चाला भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालया पासून सुरुवात करण्यात आली . तालुक्यातून आलेल्या शेतकरी कष्टकरी व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या प्रमुख मार्गाने विद्यमान सरकार विरोधी घोषणा देत उपविभागीय कार्यालय गाठले या ठिकाणी आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी सरकारच्या धोरणावर ताशेरे ओढले यवतमाळ जिल्हयाचे भाजपा महामंत्री ॲड. प्रफुलसिंह चौहान यांनी सरकारच्या भ्रष्ट्राचारावर व कार्य शैलीवर प्रश्न चिन्ह उभे केले . यानंतर भाजपा च्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना मागण्याचे निवेदन दिले व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मागण्याचे पत्र पोहचविण्यास सांगण्यात आले . जनआक्रोश आंदोलनातील प्रमुख मुद्दे असे नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये तात्काळ द्यावे .वीज कनेक्शन कापू नये विजेचे लोड शेडींग रद्द करावे . वैधानिक विकास महामंडळ त्वरित निर्माण करावे .रोजगार हमी योजनेची हमी त्वरित द्यावी .घरकुलांचा हप्ता त्वरित द्यावा ,धडक सिंचन योजनेचे अनुदान त्वरित मिळावे ,2018 पासून नवीन रेशन कार्डधारकांना धान्य द्यावे , पेट्रोल व डिझेलचे भाव सरकारने कमी करावे ,अंत्योदय बीपीएल कार्डधारकांना धान्याचा वाटप त्वरीत करावा , शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज कनेक्शन द्यावे , वनजमिनीचे पट्टे आदिवासी व गैर आदिवासींना वाटप करावे , अतिक्रमणधारकांना पट्टे द्यावे ,व्यावसायिक अतिक्रमण नियमानुकूल करण्याची कार्यवाही करावी , वापर कराची पावती द्यावी , राळेगाव शहरातील पाणी टंचाई व अनियमित पाणीपुरवठा सुरळीत करावा , महिला ग्रामीण पतसंस्थेतील भ्रष्टाचाराच्या संदर्भात कार्यवाही पूर्ण करावी . अशा विविध मागण्या जनआक्रोश आंदोलनात घेण्यात आल्या होत्या जनआक्रोश आंदोलनात आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके . जेष्ट नेते मोहनसेठ गुंदेच्या , जिल्हा महामंत्री एँड प्रफुलसिंह चौहान , जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चित्तरंजन दादा कोल्हे . शहर अध्यक्ष डॉ. कुणाल भोयर, जि.प. सदस्या प्रिती ताई काकडे पंचायत समिती सभापती प्रशांत तायडे महिला आघाडी तालुका प्रमुख विद्याताई लाड , माजी नगराध्यक्ष बबनराव भोगांरे संजय काकडे गोविंद डोगंरे डॉक्टर सविता पोटदुखे , सौ छायाताई पिंपरे श्रीमती शिलाताई सलाम, विशाल येणोरकर दिनेश गोहणे आशिष इंगोले ,किशोर जुनुनकर विनोद मांडवकर गजानन लढी , विशाल पंढरपूरे , शारदानंद जयस्वाल बाळासाहेब दिघडे अभिजीत कदम ,रणजित ठाकरे अरुण शिवणकर ,संदीप तेलंगे शुभम मुके आकाश कुळसंगे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जन आक्रोश आंदोलनात सहभागी झाले होते .