धक्कादायक :जंगली डुक्कर शिरले गावात दोन महिला व एक पुरुष जखमी ,राळेगाव तालुक्यात ही मनुष्य:वन्य प्राणी संघर्ष

रामुभाऊ भोयर :तालुका प्रतिनिधी राळेगाव


राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे जंगली डुक्कर गावात शिरुन दोन महिला व एका पुरुषांना केले जखमी. धानोरा गावात भितीचे वातावरण सविस्तर वृत्त असे सध्याच्या परस्थितीत पाण्या अभावी व चाऱ्या अभावी जंगली जनावरांनी गावाकडे धाव घेतली आहे अशातच राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे ५ जंगली डुक्कर गावात शिरून धुमाकूळ घातला आहे. सदर या धुमाकूळत दोन महिला व एक पुरुष किरकोळ जखमी झाले असुन सदर जंगली डुक्करांना गावाबाहेर काढण्यासाठी गावातील युवकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागली आहे.

जंगलातील वन्य जीव गावात येत असल्याने आता या पुढे गावकऱ्यांना मात्र चांगलीच काळजी घेत राहावे लागणार हे मात्र नक्की