
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीस दोन वर्षांच्या कारावाससह एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा निकाल राळेगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री नेरलीकर यांनी २५ आक्टोंबर रोजी सुनावला आहे. राळेगाव तालुक्यातील चहांद येथील एका महिलेचा येथीलच आरोपी पुंडलिक पांडुरंग सातघरे यांनी सन २०१६ साली विनयभंग केला होता. या प्रकरणी फिर्यादी पक्षाने वडकी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून कलम ३५४,४५२ नुसार गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणाचा तपास करून वडकी पोलिसांनी राळेगाव येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाचा निकाल २५ आक्टोंबर रोजी राळेगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री नेरलीकर यांनी दिला असून सरकारी वकील सोरते यांनी घेतलेला साक्षीपुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी पुंडलिक पांडुरंग सातघरे (४४) यास दोन वर्ष कारावास व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पैरवी अधिकारी म्हणून हरीष धुर्वे यांनी काम पाहिले तर या प्रकरणाचा तपास वडकी पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश ऊईके यांनी केला.
