जिल्ह्यात डेंग्यू सह अन्य रोगाचे डोके वर , पाण्याचे डबके साचू देऊ नका,रुग्णांनी उपचार लवकर घ्या आरोग्य प्रशासनाचे आवाहन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)

गेल्या काही महिन्यापांसून राळेगांव तालुक्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे प्रत्येक गावात साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येते आहे. विशेषतः डेंगू चे रुग्ण प्रत्येक गावात असून सोबतच साथीचे रुग्ण म्हणजे हिवताप,विषमज्वर,सह खोकला सर्दी पडसे असेही दोन तीन घराआड रुग्ण आढळत आहे.डेंगू ची जबरदस्त साथ असल्याने आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी आपल्या परीने प्रयत्न करत आहे परंतु रुग्ण संख्या वाढत असल्याने त्यांचे प्रयत्न तोकडे पडत आहे. 
          तालुक्यातील जनतेची कोरोना या आजारातून सुटका होत नाही तोच आता तालुक्यात शेकडो नागरिकांना विशेषतः लहान मुलांना डेंग्यू या आजारासह इतर साथीच्या आजारांने ग्रासले आहे. आर्थिक संपन्न असलेल्या नागरिकांनी आपले रुग्ण जिल्हा स्थानी तज्ञ डाँक्टरांच्या दवाखान्यात दाखल केले पण ज्याची परीस्थिती जेमतेम आहे त्याला ग्रामीणरुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्रा शिवाय पर्यायच नाही अशांना चांगले उपचार देण्याचा प्रयत्न होतोय पण त्यांना ही औषधी सह इतर  उपचार वेळोवेळी देण्यात अडचणी आहे.
साफ सफाई स्वच्छते कडे ग्रामपंचायत  चे दुर्लक्षित धोरणामुळे म्हणा की कामचुकारपणा म्हणा साथीचे रुग्ण याच कारणाने दरवर्षी वाढत असतात.  सध्याच्या स्थितीत ठिक ठिकाणी कचरा साचल्यामुळे मच्छरांचे प्रमाण वाढले आहेत.पावसाळ्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात उद्भवतात.डेंग्यू तसेच इतर आजार डोके वर काढतात.सध्याच्या अनियमित पावसामुळे गावात अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे.या डबक्यामध्ये कचरा कुजतो.परीणामी मच्छरांचे प्रमाण ही वाढते.