
राळेगांव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
तहसिल कार्यालय राळेगांव मधील कार्यरत तलाठी मोहनराव सरतापे साहेब यांचा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बद्दल ०१ ऑगस्ट रोजी महसूल दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे हे विशेष..
समंजस,मनमिळाऊ व जनतेची कामं त्वरित करणारे म्हणून तलाठी मोहनराव सरतापे साहेब हे सुपरिचित आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे अनेक मान्यवरांचे उपस्थिती मध्ये तलाठी मोहनराव सरतापे साहेब यांचा सत्कार अनेकांना सुखाऊन गेला,काम करणाऱ्यां ची किंमत होतेच हे च या गौरव पुरस्काराने सिध्द झाले आहे हे विशेष..
