ST कर्मचारी यांचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करिता कर्मचारी उपोषणाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा राळेगाव चा सक्रिय पाठिंबा.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी यांना राज्य सरकारी कर्मचारी मध्ये विलीन करण्यासाठी प्रत्येक आगारच्या ठिकाणी ST कर्मचारी यांचे उपोषण सुरू असुन या कर्मचारी यांच्या न्याय मागण्या साठी सुरू असलेल्या आंदोलनाला विद्यार्थी आणी शिक्षक हितार्थ सदैव अग्रेसर असणारी संघटना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा राळेगाव च्या वतीने सक्रीय पाठिंबा देण्यात आला आहे.यावेळी तालुका अध्यक्ष महेशभाऊ सोनेकर, सचिव प्रवीणभाऊ थुल,हेमंतराव निंबुलकर , संदिपराव क्षीरसागर, सागरजी धनालकोटवार ,विजयराव दुर्गे,संजयजी एकोणकर आदी शिक्षक उपस्थित होते.