कान्होली गाव पुरातुन वाचले मात्र घरांची व शेती ची अपरिमित हानी[उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली भेट, आर्थिक मदत देण्याची मागणी ]


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


संततधार पावसाने नदी, नाल्यानना प्रचंड पूर येऊन गावात पाणी शिरले. त्या मुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. हिंगणघाट तालुक्यातील कान्होली (कात्री ) येथे देखील गावाला पुराचा वेढा पडून मोठे नुकसान झाले. रेskyu टीम द्वारे येथील नागरिकं|ना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच या ठिकाणी भेट दिली. येथील पूरग्रस्त गावकरी व नुकसान ग्रस्त शेतकरी यांना मदत देण्याची मागणी होतं आहे.
वर्धा जिल्ह्यातील कान्होली ( कात्री) या गावची १८ जुलै ला झालेल्या महापुरामुळे विदारक परस्थिती पाहयला मिळाली़ . महापुरात अनेक घर पडली तर शेकडो एकर शेतात पाणी शिरल्याने उभ्या vपिकाचे नुकसान झाले, सुनिल सिंगन,गोपाल गोटेफोडे, कांताबाई सिंगन, बाबाराव बाराहाते,श्यामराव दाते, देविदास जौजाळ तर कुभार पेठेतील अरूण वालदे,किशोर वालदे, ईश्वर वालदे, प्रकाश वालदे, जम्मू वालदे, गणेश ठाकूर, संजय ठाकूर, रामकृष्ण ठाकूर, आदिचे घर पडली अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने अन्यधान, ऊपयोग वस्तू, कागद पत्रे पाण्यात भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सध्या राहायला घर नाही जवळ पैसा नाही असे दुहेरी संकट त्याच्यावर ओढले आहे
कान्होली गाव वर्धा व यशोदा नदीच्या काठावर बसले असून दोन्ही नदीचा संगम पण या ठिकाणी असल्याने पुराचा वेढा गावा भोवती होतो १८ जुलैला झालेल्या मुसळधार पावसाने व बेंबळा चे दरवाजे उघडल्याने वर्धा नदिने रौद्ररूप धारण केले पुर ईतका भयंकर होता रे skuy टिमला गाव शोधायला चक्क तिन तास लागले ४०० हून अधिक कुटुंब पुरात अडकले होते बोटिव्दारे लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर केले पुराचे पाणी ओसरल्या नंतर मात्र घरात ,रस्त्याने चिखलाचे साम्राज्य तयार झाले पडलेल्या घरातील कुटुंबानी राहायला तात्पुरते घर ऊभे करायला सुरुवात केली आहे शासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे उपविभागीय अधिकार, तहसीलदार,नायब तहसीलदार, तलाटी, सरपंच,पोलीस विभाग हे या सर्व परस्थीतीकडे लक्ष देवून आहे दररोज पाणी टैंकर, किराणा किट आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जात आहे वितरण कंपनी कडून या पुरात झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी पोल, तार या सर्व सुरळीत करण्याची कामे सुरू आहे ज्या लोकांचे घर पडले घरात पाणी शिरले त्या गरीबांचे संसार उघड्यावर पडले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असतात्यानी या गावाला भेट दिली होती गावाचे पुनर्वसन, गावातील सर्व पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत दिल्या जाईल अशी ग्वाही दिली प्रथम शासनाकडून खावटी अनूदान पाच हजार रुपये देण्यात येणार होते मात्र अद्यापही नुकसान ग्रस्तापर्यत पोहचले नाही आता कसे जगाचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शेतकर्यांच्या डोळ्यातले पाणी आणि शेतातले पाणी अद्यापही सुकले नाही गावातील घर गेले आणि शेतातले ऊभे पिके गेली अशा संकटात सापडलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्यांची शासनाकडून तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे